परभणी,(प्रतिनिधी) कलकत्ता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर व बदलापूर येथील शाळेतील विद्यार्थीनीवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी शनिवार 24 ऑगस्ट रोजी परभणीत शिवाजी चौक येथे जोरदार निदर्शने केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, शहराध्यक्ष नदीम इनामदार, शिवसेनेचे संपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, ज्येष्ठ नेते प्रा. रामभाऊ घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष जाकेर लाला, काँगे्रसचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, युवा नेते अजय गव्हाणे, रमाकांत कुलकर्णी, पंजाबराव देशमुख, अतिक ऊर रहेमान, विकास लंगोटे, ज्ञानेश्वर पवार, अर्जून सामाले, रत्नमाला सिंघनकर, जानू बी, बाळू तळेकर, दिगंबर खरवडे, श्रीकांत पाटील आदींनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच काळ्या फिती लावून सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदविला.