हिंगोली (प्रतिनिधी)बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराने महाराष्ट्र हादरला आहे. तीन ते चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील स्वच्छतागृहातील स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दिसत असून दिनांक 24 रोजी आखाडा बाळापूर येथे नवीन बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर महाविकास आघाडीच्या वतीने याप्रकरणी निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडाला काळी फीत बांधून व हातात काळे झेंडे व पोस्टर घेऊन निषेध व्यक्त केला यावेळी राज्यातील वाढत चाललेल्या महिला अत्याचार विरोधात व बदलापूर प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली
यावेळी महाविकास आघाडीचे काँग्रेस ज्येष्ठ नेते जकी कुरेशी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख डि.के. दुर्गे, शिवसेना आखाडा बाळापूर सर्कल प्रमुख बालाजी बोंढारे, शिवसेना जिल्हा उपसंघटक सोपान पाटील बोंढारे, राष्ट्रवादी डॉक्टर सेल डॉ. संतोष बोंढारे, काँग्रेस आ.बाळापूर शहर अध्यक्ष डॉ.अरुण सूर्यवंशी, माजी जि प सदस्य भगवान खंदारे, शिवसेना उपतालुकाप्रमुख रुपेश पतंगे, शिवसेना तालुका सचिव,माणिक पंडित, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपप्रमुख सुशील बोंढारे, शिवसेना अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख गुफरान कुरेशी, युवा काँग्रेस उपजिल्हाप्रमुख राहुल घोडगे, प्रवीण बयास, बेगाजी घोडगे, महम्मद भाई, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद बोंढारे, ग्रा. पं.स. सुभाष ठमके, संतोष बाभुळकर, प्रल्हाद बोंढारे, श्याम कळमकर, भीमा नरवाडे गजाननसिंह बयास यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते