देश

अल्पवयीन मुलीची छेड काढून विनयभंग करणार्‍याविरोधात कठोर कारवाईची मागणी

भटके विमुक्त विकास परिषदेचे प्रशासनास निवेदन परभणी/

 

परभणी/प्रतिनिधीश

हरातील भटके विमुक्त समाजातील अल्पवयीन शाळकरी मुलीची छेड काढून विनयभंग करणारा आरोपी रईस शेख व मुलीच्या वडिलांना मारहाण करणार्‍या अन्य आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी भटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यातील आरोविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली आहे. मात्र त्याने मुलीच्या वडिलांवर हल्ला करून स्वत:ला जखमी करून घेत त्यांच्याविरोधात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
दि. 22 ऑगस्ट रोजी परभणी शहरामधील पंचशील चौक परिसरात राहणार्‍या भटके विमुक्त समाजातील एक अल्पवयीन मुलगी ट्युशनला जात असतांना रईस शेख या युवकाने छेडखानी करून विनयभंग केला. याबद्दल तिचे वडील रईस शेख या युवकाला विचारपूस करायला गेले असता तेथील जमावाने त्यांच्यावर चाकू व लोखंडी रॉडने हल्ला केला, त्यात ते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी अजून त्या मुलीच्या वडिलांची तक्रार दाखल करून घेतली नाही. रईस शेख याच्याविरुद्ध एफआरआर दाखल करून त्याला अटक केली. मात्र त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अद्याप पकडलेले नाही. रईस शेख याने आपल्या हाताने शरिरावर घाव करून स्वतः दवाखान्यामध्ये भरती झाला आहे. त्याची खोटी तक्रार दाखल करून घेतल्या जाऊ नये. भटके विमुक्त समाजातील पिडीत कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे. पोलिसांनी ताबडतोब आरोपीवर पोक्सो अंतर्गत कारवाई करावी व मुलीच्या वडिलांंवर चाकूने हल्ला व मारहाण करणार्‍या अन्य आरोपीना सुद्धा तातडीने अटक करावी अन्यथा भटके विमुक्त विकास परिषदेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनावर भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्यवाह नरसिंग झरे, उपाध्यक्ष उध्दवराव काळे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. संजय पुरी, बीड विभाग संयोजक उमेश जोगी, जिल्हा संयोजक हनुमानसिंग कच्छवे, जिल्हा अभियान प्रभारी लक्ष्मण सोनवणे, मानवत तालुका संयोजक आकाश शर्मा, परतुर तालुका संयोजक विष्णु गिरी, वैदु समाजाचे परभणी अध्यक्ष श्रावण देशमुख आदींच्या सह्या आहेत. दरम्यान, डॉ.केदार खटींग यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेवून या मागणीचे निवेदन दिले. यावेळी भटके विमुक्त विकास परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button