अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टी महाराष्ट्रातील सर्व 288 जागा लढवणार आहे. पक्षाचे राज्य संघटन मंत्री संग्राम घाडगे पाटील यांनी ही माहिती दिली. परभणी येथे माध्यमांशी बोलताना घाडगे पाटील यांनी पक्ष कुणासोबतही आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले.
परभणी विधानसभा मतदारसंघातून आपने उमेदवार जाहीर केला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांच्या नावाची घाडगे पाटील यांनी घोषणा केली. बीड विधानसभा मतदारसंघातून अशोक येडे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आधीच जाहीर करण्यात आला आहे.विरोधकांच्या मतविभाजनाचा धोका
लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीने सत्ताविरोधी पक्षांची मोट बांधत चांगले यश मिळवले. पण, विधानसभा निवडणुकीआधीच आम आदमी पक्ष बाहेर पडला आहे. त्यामुळे विरोधकांना मतविभाजनाचा फटका बसू शकतो. 2019 मध्ये आपने जास्त जागा लढवल्या नव्हत्या. पण, यावेळी 288 जागा लढवण्याची घोषणा केली आहे.