जिज्ञासा बालविहारात रंगला दहीहंडी कार्यक्रम
श्रीराम प्रतिष्ठान संचलित जिज्ञासा बालविहार चा उपक्रम
सेलू (प्रतिनिधी)श्रीराम प्रतिष्ठान संचलित जिज्ञासा बालविहार येथे दहीहंडी निमित्त नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सविताताई रोडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कांबळे व उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कैलास ताठे जिज्ञासा बालविहारच्या सौ. शिंदे तर परीक्षक म्हणून श्री. सत्यनारायण ताठे व रवींद्र रोडगे हे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी एकूण 45 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. प्रत्येक विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या व राधाच्या वेशभूषेत येऊन वातावरण श्रीकृष्णमय केले. तसेच विद्यार्थ्याबरोबर काही पालकांनीही नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व विद्यार्थ्यांचे नृत्य झाल्यावर बालगोपालांनी समूहात नृत्य सादर केले. दहीहंडी फोडण्यात आली. या स्पर्धेसाठी सूत्रसंचालन सौ. ढाले यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री. श्याम शेळके यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिज्ञासा बालविहार पूर्ण शिक्षक यांनी मेहनत घेतली.