मराठवाडा

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी विधानसभेसाठी ओबीसीचे चार उमेदवार देणार

ओबीसी संघटनांसोबत आघाडी करणार; १५ दिवसात उमेदवार जाहीर करणार

परभणी (प्रतिनिधी)

वंचित बहुजन आघाडी व समविचारी ओबीसी संघटना व इतर संघटनांसोबत आघाडी करून पंधरा दिवसांमध्ये उमेदवार जाहीर करून वंचित बहुजन आघाडीने सत्ता स्थापनेचा संकल्प केला आहे. वंचित बहुजन आघाडी व सर्व समविचारी ओबीसी संघटनांना सोबत घेऊन आघाडी स्थापन करण्याचा संकल्प वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केल्याचे विभागीय प्रवक्ता डॉ. धर्मराज चव्हाण यांनी पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
येणाऱ्या आगामी विधानसभा २०२४ निवडणुकीच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडी व इतर समविचारी ओबीसी संघटनाना सोबत घेण्यात येणार असून त्यात एकूण १५४ उमेदवार हे संपूर्ण महाराष्ट्रातून दिले जाणार आहेत तसेच परभणी जिल्ह्यात एकूण 4 विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी ४ उमेदवार हे ओबीसी चे असणार असल्याचे व १५ दिवसात उमेदवार जाहीर करणार असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कमिटीचचे वतीने जिल्हाध्यक्ष सुनील मगरे व तुकाराम भारती यानी डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार आज पत्रकार परिषदेत केले आहे. सदरील १५४ उमेदवारांपैकी १०० उमेदवार हे ओबीसी चे असून इतर ५४ उमेदवार हे एस. सी व एस. टी प्रवर्गातून दिले जाणार असल्याचे सांगितले आहे. सदर पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निरीक्षक एडवोकेट गोविंद दळवी, राज्य उपाध्यक्ष नागोराव पांचाळ,विभागीय प्रवक्ता डॉक्टर धर्मराज चव्हाण विभागीय प्रशिक्षक सुरेश शेळके,जिल्हाध्यक्ष दक्षिण सुनील मगरे, उत्तर जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती, महिला जिल्हा अध्यक्ष सो सुनीताताई साळवे, जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव पंडित, युवक जिल्हाध्यक्ष सुमित भालेराव, ओबीसी वंचित समन्वय समितीचे सुमित जाधव , माजी महासचिव भगवान देवरे,अडवोकेट श्रीहरी भुजबळ, शहराध्यक्ष प्रमोद कुटे उपाध्यक्ष गणेश गाडे , सिद्धोधन सावंत, अनिल राठोड, सावंत, मुजफ्फर खान, अजमत खान, ओबीसीचे सवने, डॉक्टर बालासाहेब सोरेकर, आधी ओबीसी वंचित बहुजन आघाडीचे मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button