वालूर येथील मंदिरांच्या दान पेठ्यावर डल्ला मारणारा चोरटा जेरबंद
वालूर (प्रतिनिधि) लक्षमन दौंडे रा. कुपटा तालुका सेलू जिल्हा परभणी याने दारूच्या नशेच्या भरात वालूर येथील बालाजी मंदिर ,कालिका मंदिर, य तसेच वालूर पासून 2 कि .मी. अंतरावर मानवत रोडवर असलेल्या साईबाबा मंदिर येथील दानपेठ्यावर डल्ला मारल असून मागील एक आठवड्यापासून तालुक्यातील विविध गावांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना वालूर मध्ये या चोरट्याने याचा फायदा घेत मंदिरांच्या दानपेठ्यावर डल्ला मारणयास सुरूवात केली मात्र कसून चौकशी केली असता अनेक ठिकाणच्या सी. सी.टीव्ही फुटेज तपासल्यानंतर आणि पोलिसांना सुगावा लागल्याने चोरटा हा नशेच्या भरात मंदिराच्या दानपेठ्या चोरी करत होता यावेळी सेलु पोलीसचे पोलीस उपनिरीक्षक जटाळ , वालूर येथील जमादार एम एम. जाधव , पोलीस हे.काॅ एम .एस. बुधवंत, गुलाब राठोड, आदींनी या घटनांमध्ये जलद गतीने तपास करत मोठ्या शिताफीने या चोराला बेड्या घातल्या असून सदरील चोरटा मेघराज लक्ष्मण दौंडे वय 20 वर्ष राहणार कुपटा ता. सेलू याला अटक करून जेरबंद केले आहे त्यामुळे मागील एक आठवड्यापासून निर्माण झालेल्या या दहशतीच्या वातावरणापासून काही प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांना सुटका मिळालेली आहे सदरील चोरीच्या घटना या 23 ऑगस्ट 2024 च्या रात्रीच्या सुमारास 1 ते 2 वाजेच्या दरम्यान घडलेल्या आहे तर जलद गतीने तपास करत 2 दिवसात चोरटा हा जेरबंद करण्यात आलेला आहे त्यामुळे या कामांमध्ये पोलीस चक्र हे मोठ्या गतीने फिरवल्याचे दिसत आहे त्यामुळे लोकांमधून पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त होत आहे