परभणी (प्रतिनिधी) शहरातील पाथरी
रोडवर असलेल्या हॉटेल चायनाकबार अँड रेस्टॉरंट या ठिकाणी सोमवार रात्री साडेदहा वाजता च्या सुमारास काही जणांनी हॉटेल मालक व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत हॉटेल मालक जखमी झाले आहे.
या अगोदरही विविध हॉटेलवर मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. संबंधित प्रकरणांमध्ये आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा
हॉटेल चायना येथे झालेल्या मारहाण प्रकरणात परभणी जिल्हा मद्य विक्रेता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
ऑगस्ट रोजी रात्रीच्या
सुमारास काही तरुणांनी गोंधळ घातला. हॉटेल मालकासह कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत जखमी झालेल्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशीच एक घटना शहरातील शासकीय रुग्णालया परिसरात असलेल्या एम्पायर वाईन शॉपवर देखील घडली आहे. परभणी शहरात पाथरी रस्त्यावरील विसावा कॉर्नर येथे
चायना या नावाचे बार
अँड रेस्टॉरंट आहे.
काही तरुणांनी या ठिकाणी
धिंगाणा घालत हॉटेल
मारहाण केली यात हॉटेल मालक बालू अण्णा
यांना गंभीर दुखापत
झाली. हॉटेलमधील
खुर्च्य व इतर
साहित्याची नासधूस
करण्यात आली आहे.
या घटनेचा निषेध करत शहरातील दारू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत जिल्हा प्रशासनात या प्रकरणी कठोर कारवाई करून दुकानदारांना संरक्षण देण्याची मागणीचे निवेदन दिले.