वनामकृवि आणि जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या विद्यापीठ परीसरात सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना
विद्यापीठ परिसरात वावरताना विद्यापीठाचे ओळखपत्र बंधनकारक
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास आंतरराष्ट्रीय हरित विद्यापीठ पुरस्कार मिळाला आहे. विद्यापीठातील हरीत वातावरणामुळे विद्यापीठात दररोज ८ ते १० हजार नागरीक सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी येत असतात. विद्यापीठाचा हेतु परभणीतील नागरीकांना स्वास्थ पुरविणेस मदत करण्याचा आहे. तथापि, विद्यापीठ परीसरातील अश्वमेध मैदानाजवळ दिनांक २० ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ०६.०० च्या सुमारास सकाळी फिरण्यासाठी आलेल्या महीलेचे गंठण हिसकावल्याची घटना घडली असल्याचे नवा मोंढा पोलीस स्टेशन यांचेकडून विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयास कळविण्यात आले होते. त्याअनुषंगाने अशा घटनेस आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने दिनांक २६ ऑगस्ट रोजी रोजी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस प्रशासन व विद्यापीठ सुरक्षा यंत्रणा यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये विद्यापीठाने पादचा-यांना ओळखपत्रे दिली तर अशा घटनांना आळा बसण्यासाठी मदत होईल याबाबत सर्वाचे एकमत झाले. त्यानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठा अंतर्गत परभणी मुख्यालयातील सर्व कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी यांना विद्यापीठ परिसरात वावरताना आपले ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य केले आहे. तसेच विद्यापीठात फिरायला येणारे नागरीकांना वार्षीक रु.१००/- चा भरणा करून सुरक्षा अधिकारी, यांचे कार्यालयाकडून (मोबाइल नं. ७५०७३५१९३७) ओळखपत्र तयार करून दरवर्षी ओळखपत्राचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे. तसेच दररोज रात्री ११.०० ते सकाळी ८.०० वाजेपर्यंत दुचाकी व चारचाकी वाहनांना विद्यापीठ परिसरात प्रतिबंध करण्यात येत आहे. तेव्हा प्रतिबंधित क्षेत्रात लोकांनी फिरायला जावू नये असे आवाहन कुलगुरू मा. डॉ.इन्द्र मणि यांनी केले. तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे यांनी विद्यापीठ गेट (काळी कमान) येथे पोलीस चौकी देण्यात येईल आणि विद्यापीठ परिसरात पोलीस गस्त घेतील असे सांगितले. बैठकीस कुलसचिव डॉ. संतोष वेणीकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे, नवा मोंढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शरद मरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवर, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, विद्यापीठ सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कदम, विध्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पुरुषोत्तम झंवर, सुरक्षा अधिकारी श्री पी. व्ही. सुडके, सहाय्यक प्राध्यापक डॉ. एस. डी. पायाळ आणि सहाय्यक कुलसचिव श्री. पी. एम पाटील आदींची उपस्थिती होती.