वसमत मध्ये अजित पवार यांच्या सभेत गोंधळ 14 मराठा समाज बांधवावर गुन्हा दाखल..
14 मराठा समाज बांधवावर गुन्हा दाखल
वसमत मध्ये अजित पवार यांच्या सभेत गोंधळ
वसमत(प्रतिनिधी)
वसमत येथे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सभेत बोलत असताना मराठा समाज बांधवांनी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत आरक्षणा संबंधित निवेदन देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस प्रशासनाने त्यांना रोखले असता एकच गोंधळ उडाला होता. या प्रकरणी सकल मराठा समाजांच्या 14 समाज बांधवांविरुद्ध वसमत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसंनमान यात्रेचे स्वागत आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन वसमत येथील आमदार राजू नवघरे यांनी मयूर मंगल कार्यालयासमोरील मैदानात येथे 27आगस्ट बुधवार सायंकाळी 6 वाजता केले होते. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना अचानक सकल मराठा समाजाचे समाज बांधवांनी व्यासपीठाकडे विनापरवाना बेकायदेशीर धावत जाण्याचा प्रयत्न करून अजित पवार यांना मराठा आरक्षणाबाबत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करून गोंधळ घालून व्यत्यय आणला म्हणून याप्रकरणी पोलीस कर्मचारी वि.बी गुंडरे यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा प्रलाहद राखोंडे. नाथराव कदम. दासराव कातोरे. विशाल शिंदे. प्रेमानंद शिंदे. कैलास सोळंके. आत्माराम दळवी. नंदकुमार सवंनडकर. देवराव राखोंडे. संदीप कदम. संदीप भालेराव .उद्धव सवडकर .विष्णू जाधव .व अन्य एक अशा 14 मराठा बांधवांविरुद्ध कलम 123.135 प्रमाणे गुन्हा दाखल केला. असून याप्रकरणी पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.जी .महाजन अधिक तपास करीत आहे.
तीन मराठा बांधव जखमी...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा आरक्षणा संदर्भात आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करावी अशी मागणी करत एक मराठा लाख मराठा घोषणा देत मराठा समाज बांधव निवेदन देण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना अडविले यावेळी एकच गोंधळ उडाला यावेळी पोलिसांनी सकल मराठा समाज बांधवांवर बळाचा वापर केला. यावेळी तीन मराठा समाज बांधव जखमी झाले असून त्यांना वसमत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी एक मराठा बांधवांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याला नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले .
यावेळी आम्ही रीतसर मार्गाने मागण्याचे निवेदन देत असताना पोलिसांनी बळाचा वापर केला यात आमचे तिघेजण जखमी झाल्याची माहिती प्रल्हाद राखोंडे यांनी दिली.