तलाठी संतोष पवार खून प्रकरणी पोलीस प्रशासनाने सुधारित प्रेसनोट जारी करावी तलाठी संघटनेची मागणी
संघटनेचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच....
वसमत(प्रतिनिधी)
तलाठी संतोष पवार खून प्रकरणी पोलीस प्रशासनामार्फत वास्तवदर्शक सुधारित प्रेस नोट देण्याचे निर्देश करावे. आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी .अशी मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वसमत शाखेने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करीत मागील तीन दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
28 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता तालुक्यातील बोरी सावंत येथील प्रताप जगन्नाथ कराळे या युवकाने तलाठी संतोष देवराव पवार यांना आडगाव येथे तलाठी कार्यालयातच चाकूने भोसकून त्यांना जखमी केले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. पण काही वर्तमानपत्रात प्रलंबित फेरफारमुळे तलाठ्याचा खून झाला असल्याचे प्रेस नोट प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. याप्रकरणी वसमत तलाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागील तीन दिवसापासून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत काम बंद आंदोलन सुरू केले आहे .या प्रकरणी शुक्रवारी वसमत तहसीलदार यांना तलाठी संघटनेकडून निवेदन देण्यात आले की तलाठी संतोष पवार यांची अमानुषपणे नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या खुनाची प्रेसनोट पोलीस प्रशासनामार्फत अतिशय बेजबाबदार पद्धतीने कुठलीही शहानिशा न करता देण्यात आली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाची व तलाठी संतोष पवार यांची समाजात प्रतिमा विनाकारण मलिन झाली आहे. तेव्हा पोलीस प्रशासनाला त्वरित याबाबतीत वास्तवदर्शक सदर घटनेची सुधारित प्रेसनोट जाहीर करण्याबाबत निर्देशित करण्यात यावे तसेच आरोपीला जामीन न देता त्याची तत्काळ तुरुंगात रवानगी करण्यात यावी .सदर घटला जलद गती न्यायालयात विषेशविधी तज्ञामार्फत चालून आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी आधीसह अन्य मागण्या निवेदनात करण्यात आले असून या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष प्रियंका खडसे सचिव गजानन नागोरे जी.जी शिंदे.एस.के.इंगळेसह 25 संघटनेच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शरीफ आलम प्रतिनिधि वसमत