प्रिन्स सीबीएसई स्कूल येथे “Cap Cermony” व शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट शिक्षण तज्ञ पुरस्कारकर्ते डॉ. संजय रोडगे यांचा सत्कार सोहळा सपन्न.
सेलू (प्रतिनिधी) येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल येथे प्रेसिडेन्शिअल परीक्षेत पहिले येणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑरेंज कॅप व छ.संभाजीनगर येथे पंच तारांकित हॉटेलमध्ये जेवण व दुसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना यल्लो कॅप देण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्राचार्य श्री. कार्तिक रत्नाला, प्राचार्या सौ. प्रगती शिरसागर, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षकवृंद उपस्थित होते.
डॉ. संजय रोडगे यांचा कार्यभार शाळेपुरतच मर्यादित न राहता पूर्ण जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण असल्यामुळे त्यांना उत्कृष्ट “शिक्षणतज्ञ” हा पुरस्कार भेटला. याबद्दल उपस्थित पालक वर्ग व शिक्षकवृंद यांनी डॉ. संजय रोडगे यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. प्रताप सिंग शिंदे, डॉ. नाईकनवरे, प्रा. राजाराम झोडगे या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. उपस्थित पालकांनी मनोगत व्यक्त करतांना अश्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून गुणवंत विद्यार्थी घडतात म्हणून अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांचे खूप खूप धन्यवाद मानले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यामध्ये शाळेतून असे छोटे छोटे टारगेट मुलांना देऊन त्यांच्यामध्ये गुणवत्ता वाढवण्याचे प्रयत्न केले जाते. यातूनच त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होते.
“Cap Ceremony” पहिली वर्गातून प्रथम अर्नेश अशोक नाईकनवरे – द्वितीय सानवी शरद शेळके, दुसरी वर्गातून प्रथम रिद्धी रवींद्र डासाळकर – द्वितीय माधवी विजयकुमार साळुंके, तिसरी अ वर्गातून प्रथम प्रांजल प्रवीण सनाप- द्वितीय मंजिरी दिगंबर खालसे, तिसरी ब वर्गातून प्रथम प्रियल बालाजी बैंवाद- द्वितीय तनुश्री संदीप जाधव, चौथी वर्गातून प्रथम आराध्या भरत सावंत- द्वितीय समृद्धी मणिक सुरवसे, पाचवी अ वर्गातून प्रज्वल रोडगे- द्वितीय आशिष झोडगे, पाचवी बी वर्गातूनप्रथम प्रेरणा काष्टे- द्वितीय उन्नती राठी, सहावी अ वर्गातून प्रथम शिवम प्रभाकर फाटे- द्वितीय आरव अजित कुमार, सहावी ब वर्गातून प्रथम गौरी अबुज – द्वितीय रियल राठोड, सातवी अ वर्गातून प्रथम तेजश्री चौधरी – द्वितीय तत्त्वमशि शिंदे, सातवी ब वर्गातून प्रथम अभिराज मोगल – द्वितीय समर्थ मगर, आठवी अ वर्गातून प्रथम सान्वी मारेवर – द्वितीय कार्तिक अबुज, आठवी ब वर्गातून प्रथम अजित शरद झाडे – द्वितीय हर्षल संदीप जाधव, नववी अ वर्गातून प्रथम आदित्य कटारे- द्वितीय श्रीनिवास पाटील, नववी ब वर्गातून प्रथम तनिष्का तेलभरे – द्वितीय क्षितिजा खजिने, नववी क वर्गातून प्रथम कोमल धनवे – द्वितीय दिव्या काले, नववी ड वर्गातून प्रथम नागेश बेले – द्वितीय ओंकार कुरुडे, दहावी अ वर्गातून प्रथम खुशी मानधने- द्वितीय स्नेहल लगडे, दहावी ब वर्गातून प्रथम आदित्य लाटे – द्वितीय विजन खाडे. या विद्यार्थ्यांना ऑरेंज कॅप व येलो कॅप मिळाले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.कल्पना भाबट यांनी केले.