महाराष्ट्र

वालुरात सकाळी 5 वाजेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात

वालुरात सकाळी 5 वाजेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात*

वालूर (बिलाल तांबोळी)

सेलू तालुक्यातील वालूरसह वालूर आसपासच्या अनेक गावांना मुसळधार पावसाचा तडाका
आज बसला असून यावर्षीच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस झाल्याचं आज निष्पन्न झाला आहे जोरदार पावसामुळे रहदारीसाठी येणाऱ्यां जाणार्याचा शुकशुकाट दिसून आला तसेच महत्त्वाच्या कामशिवाय लोकांनी घराबाहेर निघणे टाळले त्यामुळे रसत्यावर शुकशुकाट दिसत होता विजाच्या कडकडाटासह सकाळपासुण जोरदार पाऊस बरसत होता तर सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे प्रवाश्यानाही याचा फटका सहन करावा लागला आहे तर गल्लो गल्ली जागोजागी पाणीच पाणी साचल्याने वालुरच्या ग्रामपंचायतीचा भोगळ कारबार पुन्हा एकदा समोर आला सखलभागात तर तळ्याचे स्वरूप निर्माण झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी निर्माण झाले आहे तर मागील काही महिन्यापूर्वी गावामध्ये दोन्ही बाजूने अंडरग्राउंड नाल्या करण्यात आलेले असल्याने आणि त्या नाल्यांची उंची रस्त्यापेक्षा जास्त झाल्याने रस्त्याच्या मधोमध पाणी साचू लागले तर
मातंग गल्ली, ते बस स्टॅन्ड,
बाजार ,ते बस स्टँड ,आंबेडकर नगर ते बस स्टँड ,
झोपडपट्टीकडील भाग, तसेच मोती मोहल्ला, हटकर गल्ली, कानाडी गल्ली, बालाजी मंदिरकडील रोड, आदि ठिकाणी या पाणीच पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते त्यामुळे रहदारीसाठी लोकांना मोठी कसरत करावी लागत आहे तर सारखा सकाळी 5 वाजेपासून बातमी लिहीण्याप्रर्यत सारखा 12 तास जोरदार पाऊस पडत होता त्यामुळे येजा करणारे प्रवासी आदींनाही याचा मोठा फटका बसलेला आहे त्यामुळे दिवसभर रसत्यावर शुकशुकाट दिसत होता वालूर येथील बस्स्थानक परिसरात चिखलमय वातावरण निर्माण होऊन तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे त्यामुळे या ठिकाणी बस वळविताना बस चालकाला कसरत करावी लागत आहे त्यामुळे बस्स्थानक न आणता वालुर येथील झिरो फाटा येथुनच परत नेण्यात येत आहे एकूणच काय तर जोरदार पावसामुळे वालूर ग्रामपंचायतीचीही नाकरर्तेपणा समोर आला आहे ठीक ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेल्याचे चित्र गल्लोगल्ली झालेले आहे पायी जे जा करणारे तसेच मोटरसायकल वाहनचालकांना तारेवरची कसरत करत पुढे जावे लागत आहे शेतकऱ्यांसाठी हा पाऊस समाधानकारक असला तरीही पाऊस जर आणखी काही दिवस चालू राहिल्यास याचा दुष्परिणाम ही होऊ शकतो आजघडीला शेतातील पिके बहरात आलेली असताना पाऊस जर क्षमतेपेक्षा जास्त झाला तर पिकांनाही नुकसान होऊ शकतो आज घडीला पोळ्याच्या पूर्वसंध्येला जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे सतत सकाळपासूनच पाच वाजेपासून चालू असलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावरून शुकशुकाट दिसून येत होता तर अनेकांनी घराबाहेर निघणे टाळले असल्याचे दिसत होते यामध्ये विजेचा लपंडाव ही सारखा चालू होता त्यामुळे महावितरणचाही गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला तर एकूणच पावसाची सर्व परिस्थिती बघता कही खुशी कभी गम असा पावसाचा परिणाम दिसत आहे

वालूर प्रतिनिधी बिलाल तांबोळी
रविवार दि. 1/.9/ 2024

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button