मराठवाडा
त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी
हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान
सेनगाव तालुक्यातील जांभरून रोडगे येथील गजानन मुळे यांचे सौर ऊर्जा वादळी वारा व पाऊस झाल्याने मोडून पडले.
तर दुसऱ्या छायाचित्रात फुलाजी रोडगे यांच्या झेंडूची शेती पूर्णपणे वाहून गेली.
हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कऱ्हाळे परिसरात सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या हळदीचे पीक वाहून गेले व सोयाबीन पिकात कापसात पाणीच पाणी झाल्याचे दिसून येत आहे
तसेच हिंगोली शहरांमध्ये सिद्धार्थ नगर बांगर नगर व अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरात शिरल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.
ढगफुटी झालेल्या पावसाने झालेली शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे अशी मागणी डॉक्टर विठ्ठल रोडगे यांनी केली आहे.