आमदार नितेश राणे यांच्यावर कडक कारवाई करा
काँग्रेस शहराध्यक्ष नदीम इनामदार व शिष्ट मंडळाची मागणी
परभणी (प्रतिनिधी)
मुस्लिम समाजास मशिदीमध्ये घुसून मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या आमदार नितेश राणे याच्या विरोधात कठोर कारवाई करा अशी मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यां मार्फत मुख्यमंत्र्यां दिलेल्या निवेदनात केली आहे.
काँग्रेस शिष्टमंडळाच्या वतीने मंगळवार 3 सप्टेंबर रोजी परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रात काहीजण द्वेष पूर्ण भाषण करून राज्यातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबदल आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी नितेश राणे सह इतर ही द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते इरफान उर रहेमान खान, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, माजी नगरसेवक मोईन मौली, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख मतीन, डॉ अफवान खान, सेवादलचे जिल्हाध्यक्ष शजी अहेमद खान, अहजम खान, मकसूद खान , अतिक उर रहेमान खान, आदींसह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.