मनोरंजन
जि.प.”सीईओ”पदी नितीशा माथूर यांची नियुक्ती
परभणी(प्रतिनिधी) परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी राज्य शासनाने नितीशा माथूर यांची नियुक्ती केली आहे.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी भारतीय प्रशासन सेवेतील नितीशा माथूर यांची परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती केली आहे. परभणी जिल्हा परिषदेंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर व्ही.एस. मुन यांच्या जाग ही नियुक्ती करण्यात येत असल्याचे व्ही. राधा यांनी आदेशात नमूद केले आहे.