आदित्य ठाकरे यांनी एकूण घेतल्या शेतकऱ्यांच्या वेदना
चोवीस तासात मदत जाहीर करा आदित्य ठाकरे यांची शासनाला मागणी
परभणी(प्रतिनिधी) मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील सर्वसामान्य शेतकर्यांना राज्य सरकारने तात्काळ प्रति हेक्टरी अनुदान जाहीर करावे, तसेच पीकविमा कंपन्यांना 25 टक्के अग्रीम रक्कम चोवीस तासाच्या आत द्यावयाचे आदेश द्यावेत, अशी मागणी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली.
आदित्य ठाकरे यांचे बुधवारी दुपारी देवगावफाटा मार्गे परभणी जिल्ह्यात आगमन झाले. त्यावेळी ठाकरे यांनी काही अतिवृष्टीग्रस्त भागांना भेटी दिल्या व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या याप्रसंगी खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह अन्य नेते ठाकरें समवेत होते. यावेळी ठाकरे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना छत्रपती संभाजीनगरपासून जालना जिल्हा ते परभणी जिल्ह्यातील काही अतिवृष्टीग्रस्त भागांना आपण भेटी दिल्या. त्यावेळी खरीप पिकांची भयावह अवस्था पाहिली. तसेच ठिकठिकाणी सर्वसामान्य शेतकर्यांच्या व्यथा, वेदना ऐकल्या. सामान्य शेतकर्यांना तात्काळ आधार गरजेचा आहे. परंतु, त्या दिशेने प्रयत्न होत नाहीत, हे दुर्देव आहे. वास्तविकतः या घटनाबाह्य सरकारने सर्वसामान्य शेतकर्यांना दोन प्रति हेक्टरी अनुदान जाहीर करणे गरजेचे आहे. तसेच पीक विमा कंपन्यांना 25 टक्के अग्रीम रक्कम चोवीस तासाच्या आत वितरीत करण्याचे आदेश देणेही गरजेचे आहे. परंतु, हे घटनाबाह्य सरकार, त्यातील मुख्यमंत्र्यांपासून त्यांचे मंत्री, पालकमंत्री हे निव्वळ मस्तीत आहेत. आपल्याच विश्वात आहेत. सर्वसामान्य शेतकर्यांविषयी या सरकारला काहीही देणेघेणे नाही, कृषिमंत्र्यांनी केलेल्या धावत्या दौर्यातून शेतकर्यांच्या व्यथा ऐकण्याऐवजी चिडचिड केली, अशी प्रतिक्रिया व्यक्त करतेवेळी ठाकरे यांनी आपला दौरा जाहीर झाल्यानंतर या सरकारने पंचनाम्याचे आदेश काढले, परंतु मदतीबाबत मात्र अद्यापपर्यंत आवाक्षर काढले नाही, त्यातूनच या घटनाबाह्य सरकारचे शेतकर्यांविषयीचे प्रेम व्यक्त झाले असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.