गुंड प्रवृत्तीचे लोक शाळेच्या परिसरात आढळून आल्यास पोलिसांना संपर्क करा-पोलीस अधीक्षक
सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूलला पोलीस अधिक्षकांची भेट
परभणी,.(प्रतिनिधी) शहरातील सुपर मार्केट परिसरातील लोकमान्य नगरातील सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूला बुधवार 4 सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी भेट दिली. याप्रसंगी स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, नवा मोंढा पोलीस स्टेशनचे पो. नि. शरद मरे यांच्यासह नवामोंढा पोलीस स्टेशनचे नवनाथ मुंडे, पंकज उगले, अनिल कटारे, मोहित पठाण, गंगाधर कोठे, संजय खरात, सागर शिंदे परिसरातील जेष्ठ वकील सौ. संगीता परिहार, श्रीमती मंजु सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विद्यानिकेतन शिक्षण संस्थेचे सचिव अॅड. दिपक देशमुख, मुख्याध्यापिका सौ. जया जाधव, सुशील देशमुख यांनी पोलीस अधिक्षक परदेशी यांचे स्वागत केले.
यावेळी परदेशी यांनी विद्यार्थींनीच्या सुरक्षेसंदर्भात शाळेकडून केल्या जाणार्या उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच संपूर्ण परिसराची पाहणी करून उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांना मुलींच्या सुरक्षेबाबत घ्यावयाच्या काळजीसंदर्भात आवश्यक सुचना दिल्या. तसेच गुंड प्रवृत्तीचे लोक शाळेच्या जवळपास आढळून आले तर त्वरीत स्थानिक गुन्हे शाखेला किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, असे आवाहन केले. पोलीस दल सर्वांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असेल, असा विश्वास व्यक्त करीत सर्वांनी भयमुक्त राहुन महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती दिली.