मराठवाडा
जिल्ह्यात सरसगट ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजाराची मदत करा,
प्रताप देशमुख यांनी केली कृषिमंत्री मुंडे मुंबई यांच्याकडे मागणी
परभणीः जिल्ह्यात सरसगट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत व्हावी व परभणी शहरात भूमिगत गटार योजने संदर्भात मराठवाडा कृषी विद्यापीठाची जागा शिवरेस्ट टॅंकसाठी महापालिकेला देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देऊन केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मुंडे हे गेल्या दोन दिवसात परभणी जिल्ह्यात पाऊसामुळे झालेल्या अतिवृष्टी भागाच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी जिल्हाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.