मराठवाडा
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली पेडगाव सर्कल मध्ये बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे परभणी जिल्हा दौर्यावर आले असता त्यांनी आज बुधवार चार सप्टेंबर रोजी पेडगाव जिल्हा परिषद सर्कलमधील काष्ठगाव, सय्यदमिया पिंपळगाव, एकुरखा, पेडगाव, वडगाव इक्कर इत्यादी गावातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करत शेतकर्यांशी संवाद साधला. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफ व एसडीआरएफ सोबत 25% अग्रीम रक्कम तात्काळ देव असे आश्वासन दिले. काल गुरुवारच्या मनसे मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही मुंडे यांनी याप्रसंगी सांगितले. मुंडे दौऱ्यावर आले असता परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांना पावसाने वाहून गेलेले कापसाचे झाड देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.