वसमत (इसाक पठाण)
वसमत शहर व तालुक्यात पावसाने थैमान घालत हाहाकार माजविला असून यात घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली घरात पाणी शिरल्याने घरात पाणीच पाणी झाले आहे गरिबांचे संसार उघड्यावर आले आहे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडले आहेत शेतकऱ्यांचे खरिपाचे पिक पाण्यात गेले त्या मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे या संदर्भात काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष शेख अलीमोद्दीन यांनी पिडीतांना नुकसान भरपाई तात्काळ द्यावी म्हणून पुढाकार घेतला त्यांनी प्रत्येक्षात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन समस्या मांडल्या नाना पटोले यांनी लगेच वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांना फोन करून नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई तात्काळ द्यावी असे निर्देश दिले
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डाॅ.एम.आर.क्यातमवार,तालूका अध्यक्ष राजाराम खराटे इत्यादी उपस्थित होते