Uncategorizedमराठवाडा
जिंतूर च्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी जीवन बेनीवाल यांची नियुक्ती
परभणी(प्रतिनिधी)
भारतीय पोलीस सेवेतील 8 परिविक्षाधीन अधिकार्यांना पदस्थापना दिली असून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने याबाबत दिनांक 5 सप्टेंबर रोजी आदेश काढले आहेत. यात परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी जीवन देवाशिष बेनीवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बेनीवाल हे 2022 च्या आयपीएस बॅच चे असून हैद्राबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत त्यांनी संस्थात्मक प्रशिक्षण पुर्ण केले आहे. महाराष्ट्र शासकीय संवर्गात दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी ते रूजू होणार आहेत.