पोलिसांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न फसला
गंगाखेड पोलिसांचे उल्लेखनीय कार्य
परभणी (प्रतिनिधी) गंगाखेड एका खाजगी शिकवणीसाठी
जाणाऱ्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीस ऑटोमध्ये बसवून परळी रस्त्यावरील मार्केट यार्डात सामसूम ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना गंगाखेड पोलीसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने मोठा मुलगी अत्याचार होण्यापासून बाल बाल बचावली, ही घटना बुधवार 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इयत्ता नववीच्या वर्गात
शिकणारी अल्पवयीन मुलगी खाजगी
शिकवणी वर्गासाठी पायी जाते. दहा
दिवसांपूर्वी एका ऑटो चालकाने तिचा
पाठलाग करून मोबाईल नंबरची चिठ्ठी तिच्या अंगावर टाकली होती. तेंव्हा अल्पवयीन मुलीने ती चिड्डी फाडून फेकून दिली होती. त्यानंतर बुधवार 4
सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजेच्या
सुमारास अल्पवयीन मुलगी शिकवणी
वर्गासाठी जात असतांना त्या0ऑटोचालकाने तिला बळजबरीने ऑटो रिक्षा बसविले दोन तरुणांनी एका अल्पवयीन मुलीस ऑटोमध्ये बसवून नेल्याची गोपनीय माहिती गंगाखेड पोलिसांना मिळाली. पोनि. दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. आदित्य लोणीकर, सपोनि, शिवाजी सिंगणवाड यांनी क्षणाचा ही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. आरोपी अनिल बापूराव जाधव व भैय्यासाहेब शंकर इंगळे यांना पकडून ताब्यात घेत मुलीची सुटका केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिराने दोघांविरुद्ध अत्याचाराच्या कलमांसह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाचे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर हे करीत आहेत.