मुस्लिम समाजाबदल द्वेष पूर्ण वक्तव्य करणाऱ्या आमदार नितेश राणे यांची आमदारकी रद्द करा
काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे पूर्णा तहसीलदार यांना निवेदन
आज गुरुवार 5 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेशराव वरपूडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाअध्यक्ष मिन्हाज कादरी यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा शहर आणि तालुका काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग शिष्टमंडळाच्या वतीने पूर्णा तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल यांना निवेदन. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबदल आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी आमदार नितेश राणे यांची आमदारकी रद्द करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. निवेदनावर काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हाअध्यक्ष मिन्हाज कादरी , जिल्हाउपाध्यक्ष अब्दुल वाहिद खुरेशी , पूर्णा तालुका अध्यक्ष प्रल्हाद पारवे , तालुकाध्यक्ष अल्पसंख्याक शेख रफिक , माजी शहराध्यक्ष अब्दुल सलीम ,
शहराध्यक्ष अल्पसंख्याक अब्दुल रशीद , शहराध्यक्ष शेख अहेमद , जिल्हाअध्यक्ष मीडिया नितीन धामनगावे , शहराध्यक्ष मागासवर्ग शेख इलियास , माजी शहराध्यक्ष काँग्रेस सुनील ठाकूर , जिल्हा उपाध्यक्ष शेख मुख्तार , मुजमिल खुरेशी , शेख बशीर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.