हिंगोली (प्रतिनिधी) विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे श्री चक्रधर स्वामी व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व 5 सप्टेंबर शिक्षक दिनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या भूमिकेत शाळेची सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊन आजच्या दिवशी शाळेचे प्रशासन उत्तम प्रकारे सांभाळले व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अध्यापन करून स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यध्यापकाच्या भुमिकेत सुर्यकांत घोशीर या विद्यार्थ्यांने चांगल्या प्रकारे आपले कर्तव्य पार पाडले. तसेच यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब , उपाध्यक्षा आनंदीताई बेंगाळ, सचिव श्री अंकुशराव बेंगाळ ,प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ ,मुख्याध्यापक श्री शिंदे आर. बी .,मुख्याध्यापक श्री व्ही. एस. सरकटे, पर्यवेक्षक श्री कसाब पी.पी. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
वरील सर्व मान्यवरांनी श्री चक्रधर स्वामी व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच शिंदे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सूत्रसंचालन श्री शिंदे आर .बी .यांनी केले व आभार श्री रोकडे सर यांनी मानले.