Uncategorized
सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा जिंतूर येथे शिक्षक दिवस उत्साहात साजरा
जिंतूर (प्रतिनिधी)
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये गुरुवार पास सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्याध्यापक यांच्या हस्ते सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाषण, गीते सादर केली. तसेच शिक्षकांनी सुद्धा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या दिनावर प्रकाश टाकण्यात आला तसेच जीवनामध्ये शिक्षकांचे किती महत्त्व आहे हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मझहर सिद्दिकी सर तसेच आभार प्रदर्शन तल्हा सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक व इतर करीत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.