सेलू (प्रतिनिधी)
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती, भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन आणि शिक्षक दिनानिमित्त सेलू येथील नूतन विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पालक शिक्षक संघाच्या वतीने गुरुवारी (पाच सप्टेंबर) यथोचित सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतोष पाटील होते. याप्रसंगी उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष
प्रा.संजय पिंपळगावगावर, शुभदा सुभेदार, माधवी पिंगळे, वाल्मिक खुळे, सतीश जाधव, सुनील गायकवाड, लक्ष्मण सोळंके, जयदत्त बावणे, वंदना पाटील, गोरखनाथ घायाळ, शोभा घायाळ, वैशाली लव्हाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आणि भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जेष्ठ शिक्षक संतोष पाटील, गोरखनाथ घायाळ यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेट वस्तू देऊन सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला. भारतीय स्टेट बँकेच्या वतीने शाखा व्यवस्थापक अनंत घावडे, प्रवीण जायभाय, रवि घनसावंत यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. या वेळी हर्षदा वाघमारे, अनुजा धापसे, आरिजखान पठाण, गजानन ढवळे, सिद्धी शेरे, अनुष्का नरवडे, आराध्या साखरे, शिक्षा खुळे, सृष्टी कटारे, श्रद्धा ताठे, रोहन वाघमारे या विद्यार्थ्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक पी.टी.कपाटे यांनी केले. सूत्रसंचालन अनुजा सुभेदार, अर्चना कुलकर्णी यांनी केले. सुनीता सांगुळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला माता पालक संघ, परिवहन समितीचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन
सेलू येथील नूतन विद्यालयातील शिक्षक दिनानिमित्त पालक शिक्षक संघाच्या वतीने गुरुवारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.