वसमत येथे शांतता समितीची बैठक संपन्न
वसमत (इसाक पठाण)
वसमत शहर पोलीस स्टेशन येथे ईद ए मिलादुन्नबी सल्लम व गणेश उत्सव निमित्ताने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत ईद उत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच या काळात विज,पाणी, स्वच्छता या संदर्भात चर्चा झाली
यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने , जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, तहसीलदार शारदा दळवी,उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात नगरपरिषदेचे अधिकारी निलेश सुंकेवार,महावितरणचे अधिकारी गच्चे यांच्यासह शहर पोलिस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे, मौलाना इम्तियाज बरकाती,अमजद खान ऊर्फ नम्मू, सुभाष लालपोतू, मन्मथ बेले, अजगर पटेल, मौलाना जाहेद शरीफ , महमद अतिक पापूलर,यांच्यासह मोठ्या संख्येने विविध पक्षांचे नेते पदाधिकारी,कार्यकर्ते, पत्रकार, आदी उपस्थित होते
बैठकी नंतर जिल्हा पोलिस पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी वसमत शहरातील दगडगाव रोड खदान या ठिकाणी जाऊन विसर्जन ठिकाणाची पाहणी केली तसेच इरिगेशन येथील विहिरीची देखील पाहणी केली त्यावेळी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .