डॉ. सुरेश हिवाळे यांना विद्यावाचस्पती पदवी जाहीर
सेलू (प्रतिनिधी) येथील नूतन विद्यालयातील मराठी विषयाचे सहशिक्षक डॉ. सुरेश हिवाळे यांना मानव्य विद्याशाखे अंतर्गत राज्यशास्त्र विषयात ‘ हैदराबाद मुक्ती संग्रामात मराठवाड्यातील पाच प्रमुख शिक्षण संस्थांचे योगदान – एक अभ्यास ‘ या शोध प्रबंधासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडची विद्यावाचस्पती पदवी शुक्रवार ( दि. ६) रोजी जाहीर झाली आहे. त्यांनी मार्गदर्शक नूतन महाविद्यालय, सेलू येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी आणि सहमार्गदर्शक नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड येथील उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम यांच्या मार्गदर्शनात आपले संशोधन पुर्ण करुन विद्यापीठाला सादर केले. ते प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांचे १६ वे संशोधक विद्यार्थी आहेत. डॉ. सुरेश हिवाळे यांना विद्यावाचस्पती पदवी जाहीर झाल्याबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया, उपाध्यक्ष डी.के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे, प्रा. भगवान काळे, डॉ. भालचंद्र धर्मापुरीकर, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, त्र्यंबक वडसकर, माणिक पुरी, मारूती डोईफोडे, डॉ. सखाराम कदम, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, डॉ.शरद ठाकर, बबनराव आव्हाड, प्रा. नागेश कान्हेकर, परसराम कपाटे, विजेंद्र धापसे, मुरलीधर डाके, कृष्णा कानडे, बाळू बुधवंत यांनी अभिनंदन केले आहे.
पुर्ण