वसमत मध्ये गुरू गौरव पुरस्कार सोहळा थाटात संपन्न
वसमत(इसाक पठाण)
वसमतचे लोकप्रिय आमदार राजू नवघरे यांच्या वतीने आयोजित गुरू गौरव पुरस्कार सोहळा थाटात पार पडला
वसमत विधान सभा मतदारसंघातील संस्था व जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत शिक्षकांचा आदर सन्मान व्हावा त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा या हेतूने वसमतचे लोकप्रिय आमदार राजू नवघरे यांनी गुरू गौरव पुरस्कार देणयाचे निश्चित केले. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरु गौरव पुरस्कार सोहळा शहरातील मयुर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात १११ शिक्षकांना गुरू गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला..
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी यु.टी.पवार तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.जगदिश कदम तसेच जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी दिग्रसकर , शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनटक्के, औंढा गटशिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले , वसमतचे गटशिक्षणाधिकारी सोनटक्के ,बालू मामा ढोरे,जिजा हरणे, अमजद खान ऊर्फ नम्मू, मोबीनदा, विठ्ठल पवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत देवणे, शिक्षण विस्तार अधिकारी विवेक पेडगावकर, पांडुरंग लांडगू,शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर व शिक्षक , मोठ्या संख्येने उपस्थित होते..
या वेळी आमदार राजू नवघरे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की नवोदय विद्यालय प्रवेश सराव परीक्षा , शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजना बरोबरच शहरी व ग्रामीण विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी सोय व्हावी म्हणून 200 सायकली देण्यात आले दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले विघार्थ्या प्रमाणे त्यांना घडवायची जबाबदारी असलेल्या शिक्षकांचा आदर सन्मान व्हावा त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे यासाठी गुरू गौरव पुरस्कार देण्यात येत आहे आम्ही एकदा हाती घेतलेली सेवा कधी खंडीत करत नाही त्याच प्रमाणे हा गुरु गौरव पुरस्कार सोहळा दरवर्षी घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले शिक्षकांची अशैक्षणिक कामातून सुटका व्हावी यासाठी वेळोवेळी विधानसभेत आवाज उठविला .
याप्रसंगी छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळा स्वानंद कॉलनी वसमत शाळेतील श्रीमती सारंग मॅडम , कैलास राठोड मुख्याध्यापक फुलसिंग नाईक विद्यालय वसमत , कृष्णराव देशमुख मुख्याध्यापक जवाहर बालक विद्यालय वसमत,यशवंतराव चव्हाण विद्यालय मुख्याध्यापक सुलेमान भातनासे , मुख्याध्यापक आयशा इकबाल उर्दू शाळा वसमत सय्यद रशीद , महात्मा फुले विद्यालय वसमत सहशिक्षक एडके , सहशिक्षक तथा ज्येष्ठ पत्रकार इसाक पठाण वसमत,बहिर्जी विद्यालय वसमत मुख्याध्यापक जाधव मॅडम ,विवेक वर्धनी विद्यालय सहशिक्षिका पवार मॅडम पवन शर्मा सर संदेश अडकिने , मुख्याध्यापक गुलाम जावीद ,महमद मुदस्सीर मुनाफ, पठाण मुमताज बेगम, यांच्यासह संस्था व जिल्हा परिषदेचे अशा एकुण 111 शिक्षकांना गुरू गौरव पुरस्कार देण्यात आला .