मराठवाडाविदेश

पावसाने घेतली विश्रांती आता शेतकऱ्यांना गरज मदतीची

आमदार खासदार मंत्री यांचा पाहणी दौरा

वसमत (इसाक पठाण)
वसमत विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सध्या पावसाने विश्रांती घेतली असून आजी माजी आमदार ,खासदार, मंत्री व महसूल प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरिप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली जात आहे व शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले जात आहे
वसमत विधानसभा मतदारसंघात आगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली पावसाने धुमाकूळ घातला नदी नाले ओढे दुथडी भरून वाहू लागले होते पावसाचे व पुराचे पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन कापूस तूर मूग उडीद ज्वारी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही ठिकाणी गुरे ढोरे मरण पावले शेत जमीनी खरडून गेल्या शहरी व ग्रामीण भागातील कच्ची घरे पडली गरिबांचे संसार उघड्यावर आले
अशा अडचणीच्या काळात शेतकरी, पूरग्रस्त शेतकरी व नागरिक यांच्या नजरा नुकसान भरपाई कडे लागले
दरम्यान राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री अनिल भाईदास पटील नुकसानीची पाहणी करण्यासाठी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले त्यांनी वसमत तालुक्यातील
ईजनगाव पूर्व पाटी येथील सोयाबीन पिकाची पाहणी केली व किन्होळागावामध्ये शिरलेल्या पाण्याची पाहणी केली तसेच कुरुंदा येथील नदी वरचा पूल व नदीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन चर्चा केली शेतकऱ्यांना तात्काळ शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देणार असल्याचे देखील सांगितले आहे व तहसील कार्यालय येथे सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये काही गावच्या शेतकऱ्यांचे गुराढोरांचे नुकसान झाले होते त्यामध्ये पाच शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आला व आरोग्य विभाग व इतर विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू नवघरे सह जिल्हाधिकारी गोयल, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी, तालुका कृषी अधिकारी .जिल्हा कृषी अधिकारी . पोलीस प्रशासन .तलाठी . ग्रामसेवक .व इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी या पाहणी दौरा दरम्यान उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यां बरोबरच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ही नुकसानीची पाहणी केली हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली व तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले याच प्रमाणे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आदिंनी पाहणी दौरे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली
पाऊस थांबला आजी माजी आमदार, खासदार मंत्री यांचे दौरे झाले नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाच्या वतीने केले जात आहे आत्ता मात्र शेतकऱ्यांचे डोळे नुकसान भरपाई मदतीकडे लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button