रेल्वे इन्स्टिट्यूटच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार सोहळा संपन्न
पूर्णा (प्रतिनिधी) कम्युनिटी हॉल समोरील रेल्वे इन्स्टिट्यूट या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या रेल्वे इन्स्टिट्यूट या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली होती रेल्वे मजदूर युनियन या संघटनेने एक हाती विजय मिळवून यश संपादन केल्याबद्दल भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला.
मागील दोन वर्षाचा गॅप वगळता पुन्हा एकदा रेल्वे मजदूर युनियन ने सत्ता स्थापन केली यानिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तुळशीराम उर्फ बाळू गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील एकतर्फी विजयी झालेल्या संचालक मंडळाचा सत्कार सोहळा दिनांक 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता रेल्वे इन्स्टिट्यूटच्या व्यासपीठावर संपन्न झाला रेल्वे मजदूरी युनियन चे विभागीय सचिव कॉम्रेड टी मनी कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक मंडळ व निवडणूक यशस्वी करून जिंकणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला जल्लोषाच्या वातावरणात पार पडलेल्या कार्यक्रमात संचालक मंडळास मंडळाचा सत्कार करण्यासाठी रेल्वेच्या विविध संघटनांचे पदाधिकारी ही मतभेद विसरून कार्यक्रमाला उपस्थित होते
सत्कार समारंभा नंतर माध्यमांशी बोलताना मजदूर युनियनचे नेते कॉम्रेड टीम आणि कुमार यांनी सांगितले की मागील दोन वर्षात मागील सत्ताधाऱ्यांनी रेल्वे इन्स्टिट्यूट रेल्वे कम्युनिटी हाल व रेल्वेचे मैदान तसेच मिनी स्टेडियम या सर्व भागांची कचराकुंडी केली आहे आम्ही आता सत्तेत आलो आहोत त्यांनी सांगितले की आश्वासन दिल्याप्रमाणे रेल्वे कमिटी हॉल चे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर कम्युनिटी हाल समोरील मिनी स्टेडियमचे छत्रपती शिवाजी महाराज असे नाव देण्यात येईल त्यासाठी देखील एक मोठा कार्यक्रम रेल्वे च्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतला जाईल असे आश्वासन देऊन या पुढे रेल्वे मजदूर युनियन कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही.
याप्रसंगी नवनिर्वाचित सचिव तुळशीराम निवृत्ती उर्फ बाळू गायकवाड सहसचिव राजू जळबा भिसे कोषाध्यक्ष शैलेश विश्वकर्मा संचालक दीपक अहिरे आम्ही रॅली दीपक नागोराव जॉन अजय शिवप्रसाद यांचा विविध मान्यवरांच्या तर्फे सत्कार करण्यात आला रेल्वेतील विविध कामगार संघटना व पूर्ण शहरातील विविध संघटनांच्या वतीने नवनिर्वाचित संचालक मंडळाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सी के खंदारे सीसीएस चे संचालक कपिल थोरात शेख जावेद नितीन चव्हाण कॉम्रेड अशोक कांबळे दिलीप इंगोले शामराव जोगदंड संजय कुमार इंगळे मंगेश खराटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संचालक मंडळाचा सत्कार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हर्षवर्धन बागुल दिलीप सोनवणे विजय ठाकूर एमडी निसार जगमोहन शर्मा मुकदम राजू खंदारे संभाजी काळे गंगाधर कांबळे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले