आ.बाळापुर ते शिर्डी पदयात्रा रवाना साई भक्तांकडून स्वागत
आ.बाळापूर (प्रतिनिधी)
श्री साईबाबा यांचा हम सब एक है. सबका मालिक एक. संदेश देत मागील 24 वर्षापासून अविरत आ. बाळापुर ते शिर्डी पदयात्रा निघते यावर्षी दिनांक 13 रोजी आ.बाळापुर ते शिर्डी पदयात्रा निघाली असून यात्रेचे हे रोप्य महोत्सवी वर्ष असल्याने साई भक्तांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते सकाळी सहा वाजता शेकडो साईभक्त आकर्षक फुलांनी सजवलेली पालखी घेऊन पायी शिर्डी कडे रवाना झाले
आ.बाळापूर येथील प्रसिद्ध साई मंदिर येथून पदयात्रा निघून आ.बाळापूर -कळमनुरी- सावरखेडा – हिंगोली- औंढा नागनाथ – जिंतूर – मंठा – सोलगव्हाण- जालना – लाडगाव – छत्रपती संभाजीनगर- लासुर – उक्कडगाव मार्गे शिर्डीत पोहोचणार आहे
दरम्यान सकाळी शिर्डी पदयात्रेचे स्वागत शिवसेना जिल्हा उपसंघटक सोपान पाटील बोंढारे व मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले यावेळी शेकडो साईभक्त उपस्थित होते