विहिरीत उडी घेऊन असलम कुरेशी यांनी केली आत्महत्या
वालूर (प्रतिनिधी बिलाल तांबोळी )
सेलू तालुक्यातील वालूर येथे 12 सप्टेबर गुरूवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास असलम समद कुरेशी वय 30 वर्ष यांनी दर्गा हज़रत आलम शहीद हद्दीत असलेल्या विहरित उडी घेऊन आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच वालुर गावातील नागरिकांनी दर्गा परीसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती घटनास्थळी जमादार जाधव साहेब यांच्या सह पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेत घटनेचा पंचनामा केला
व मयतास उच्चस्त्रीय तपासणीसाठी सेलू उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले गेल्या काही दिवसापासून
असलम कुरेशी यांच्या मेंदूवर आजाराचे परिणाम झाल्याने मयत असलम कुरेशी यांच्या नातेवाईकांनी उपचार हेतु परभणी औरंगाबादच्या दवाखान्यात उपचार केले होते परंतु असलम कुरेशी यांचे मेंदूचे आजार वाढल्याने त्यांची मनस्थिती अधिक बिघडली होती शेवटी असलम कुरेशी यांना पुणे येथे मेंटल हॉस्पिटल येथे उपचार हेतू दाखल केले होते परंतु तेथे काही दिवस उपचार करून सुद्धा आजारात बदल झाला नसल्याने शेवटी मेंदूच्या आजाराला कंटाळून त्यांनी विहीरीत उडी घेऊन आपली जिवन याञा संपवली वालूर येथिल इदगाह कब्रस्थानात आज दिनांक 13 सप्टेबर शुक्रवार रोजी दफनविधी कऱण्यात आली