स्वातंत्र्य सैनिक पुरभाजी हेंद्रे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आखाडा बाळापूर (प्रतिनिधी)
हिंगोली जिल्ह्यातील आ.बाळापूर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक पुरभाजी हेंद्रे यांच्या पार्थिवावर शासकीय रुग्णालयासमोरील त्यांच्या शेतात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांना बंदुकीच्या फेरी झाडून पोलीस दलाने बिकूलाची शोक धून वाजवून मानवंदना दिली
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पुरभाजी हेंद्रे यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले होते त्यांच्या निधनाची वार्ता समजतात समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती
आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी पोलिसांनी शोकधून वाजवून व बंदुकीच्या तीन फेऱ्या झाडून मानवंदना दिली आ. बाळापूरचे पोलीस निरीक्षक गुट्टे यांनी स्वातंत्र्य सैनिक पुरभाजी हेंद्रे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले अंत्यविधी प्रसंगी आखाडा बाळापूर व परिसरातील समाजातील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.