परभणीत आंतरराष्ट्रीय स्तराच्या मुशारा कार्यक्रमाचे आयोजन
21 सप्टेंबर रोजी गोल्डन फंक्शन हॉल येथे होणार कार्यक्रम
परभणी (प्रतिनिधी)
सय्यद खालेद उर्फ सज्जु लाला व अब्दुल हफिज चाऊस यांच्या स्मरणार्थ सज्जु लाला मित्र मंडळाच्या वतीने जागतिक स्तराच्या मुशायऱ्याचे आयोजन परभणीत करण्यात आले आहे. या मुशाऱ्यात देश- विदेशातील शायर उपस्थित राहणार आहेत. लावणार आहेत. शनिवार 21 सप्टेंबर रोजी हा मुशायरा कार्यक्रम धार रोडवरील गोल्डन फंक्शन हॉल येथे होणार आहे. या मुशार्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
परभणी जिल्ह्यात यापूर्वीही मोठ-मोठे मुशायरी आयोजित करण्यात पण परभणीच्या मुशायरा कार्यक्रमाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वात मोठा मुशायऱ्याचा कार्यक्रम घेतला जात आहे. हा मुशायऱ्याचा कार्यक्रम स्व. सय्यद खालेद उर्फ सज्जु लाला व अब्दुल हफिज चाऊस यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये खा. इम्रान प्रतापगढी (प्रतापगढ), नवाज देवबंदी (देवबंद), नदीम फरोगा (लखनऊ), आयपीएस खैसर खालेद (मुंबई), मेहशर आफ्रीदी (मसुरी), अजीज पातळीवरील नबील (दोहा, खतर), अनवर मुशायऱ्याचे कमाल (बहेरीन), अजीम शाकीरी (दिल्ली), उस्मान मिनाई (बाराबंकी), हामेद भुसावळी (भुसावळ), इम्तीयाज वफा (काठमांडू नेपाळ), निखत उमरोही (उमरोहा), मनिका दुबे जबलपुर), नवाज देवबंदी , बिलाल सहारनपुरी (सहारनपुर) आधी नामवंत शायर सहभागी होणार आहेत. आहे. माजी उप महापौर माजु लाला यांच्या वतीने या मुशायऱ्याचे शानदार नियोजन केलेले आहे. या मुशार्यात जास्तीत जास्त संख्येने श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सय्यद समी उर्फ माजू लाला यांच्यावतीने करण्यात आले आहे.