परभणी (प्रतिनिधी)परभणी तालुक्यातील पिंंगळी येथे 30 वषीय युवकाचा शुक्रवार 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास खून झाल्याची घटना घडली. यातील मयताचे नाव शेख गौस शेख महेबुब असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
शेख समीर शेख नसीर (वय 25), शेख नसीर शेख मुसा (वय 45 वर्ष दोन्ही रा.पिंगळी) दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
शुक्रवारी (दि.13) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मयत शेख गौस यास परभणीला चल, दारू पिऊन मजा करुत असे म्हणाले असता त्यावर परभणीला जाण्यास नकार दिल्यावरून आरोपी व मयतामध्ये बाचाबाची झाली. त्या दोघांनी शेख गौस शेख महेबूब याच्या डोक्यात,चाळ्यावर,मानेवर व हातांवर,पायावर,पाठीवर काठीने जबर मारहाण करून जिवे मारुन टाकले. मयताचा भाऊ शेख साबेर शेख महेबुब यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलीस ठाण्यात दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास ताडकळसचे ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे हे करीत आहेत.