परभणी (प्रतिनिधी)
पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका घरासमोर लावलेल्या बोलेरो वाहनातून तीन लाख रुपयाचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला कारवाई परभणी तालुक्यातील पेडगाव येथे शनिवारी रात्री करण्यात आली.
पोलीस अधिक्षक श्री रविन्द्रसिंह परदेशी, यांचे मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधिक्षक श्री यशवंत काळे यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक श्री. अशोक घोरबांड स्थानिक गुन्हे शाखा, परभणी स.पोलीस निरीक्षक श्री. राजु मुत्येपोड, पोउपनी चंदनसिंह परीहार, रवी जाधव, पोशी शेख रुफीयाददीन, पोह वीलास सातपुते, पोशी निलपत्रेवार, पोशी परसराम गायकवाड हे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस स्टेशन गामीण हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करण्याकरीता खाजगी वाहनाने शनिवार 14 सप्टेंबर रोजी पेट्रोलींग करीत असतांना ठिक 7.30 वाजता पेडगाव येथे एका विना नंबरचे बुलेरो वाहनात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली गुटखा चोरटी विकी करण्याकरीता घेउन आला असुन सदर वाहन आरोपीच्या घरासमोर लावुन असल्या ची गुप्त माहिती पोलीस पथकाला मिळाली. पेडगाव येथील सदर विना नंबरचे बुलेरो वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यात प्रतिबंधित राजनिवास गुटखा व प्रतिबंधित जाफरानी सुगंधित जर्दा असा तीन लाख रुपयाचा माल आढळून आला पोलीस पथकाने सदरील म** व पाच लाख रुपये किमतीची बोलेरो असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व
रेणुकादास शुभम अकोलकर वय 28 वर्षे रा. पेडगाव जि परभणी यांना ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी आरोपीस मालाबाबत विचारले असता त्याने सदर माल हा त्याचा भागीदार जगन्नाथ टेकाळे रा.आळंद ता.जि.परभणी याचा असल्याचे सांगीतले तसेच सदर माल हा संदिपशेट रा. रावराजुर जि.जालना याचेकडुन विकत आणल्याचे सांगुन तो माल झरी येथील विकास देशमुख, पेडगाव येथील रमा गायकवाड, व समीर शेख आझमचौक परभणी यांना पुरवठा करतो असे सांगीतल्याने सदरील सर्व आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन परभणी गामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परीहार हे करीत आहेत.