जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाव्हळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केला आत्मदाहनाचा प्रयत्न
पोलिसांनी तात्पर्य दाखवत पेट्रोलची बॉटल हिसकावली
परभणी (प्रतिनिधी)
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ज्ञानोबा वाव्हळे यांनी विकास कामना निधीसाठी वारंवार पत्र व्यवहार केला. मात्र पालकमंत्र्याकडून व जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांचे पत्राचे उत्तर न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी बुधवार 18 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपला मुलासह आत्मदहनाचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस उपस्थित असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी पेट्रोलची बॉटल जप्त करत जिल्हाधिकारींची संवाद साधत मध्यस्थी केली. परंतु लेखी आश्वासन दिल्याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय सोडणार नसल्याचा पवित्रा ज्ञानोबा वावळे
यांनी घेतला वअधिकाऱ्यांना धारेवर धरले पोलीस आणि प्रशासन दोघांच्या मदतीने ज्ञानोबा यांना कार्यालयात बसून ठेवण्यात आले होते. जिल्हा नियोजन अधिकारी यांनी वावडे यांना लेखी आश्वासनाचे पत्र दिल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सोडले.