पूर्णा (प्रतिनिधी)पेरियार रामास्वामी नायकर आयुष्यभर अंधश्रद्धा ब्राह्मणवाद याविरुद्ध लढले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समकालीन समाज सुधारक म्हणून प्रसिद्ध होते असे प्रतिपादन हिंदुस्तान पेट्रोलियम चे निवृत्त जनरल मॅनेजर इंजिनियर तथा विचारवंत मधुकर इंगोले यांनी केले
पूर्णा शहरातील बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती च्या वतीने 77 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला अनाघारी धर्मपाल यांची 168 जयंती तसेच यशवंतराव भीमराव आंबेडकर तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन व ई व्ही पेरियार रामास्वामी नायकर यांची 145 वी जयंती बुद्ध विहारात साजरी करण्यात आली विहार समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक बदलत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे म्हणून विचारवंत मधुकर इंगोले उपस्थित होते याप्रसंगी त्यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समकालीन असलेले आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टिकोन यातून जगले हिंदू धर्मातील जुनाट परंपरा आपापसातील जातीभेद असमानता अंधश्रद्धा याविरुद्ध लढा दिला आजही तामिळनाडूसह दक्षिणेतील अनेक राज्यात एरिया रामोस्वामी यांच्या विचारांचा पगड आहे देव ही संकल्पना त्यांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला देव सर्वांचे भले करतो तर गरीब श्रीमंत राजा आणि गुलाम खालच्या जातीवरच्या जाती असा भेद का असे विचार त्याकाळी त्यांनी मांडले. हा कार्यक्रम भंते पय्यावंश याचां संयोजना खाली घेण्यात आला
यावेळी रिपाई नेते प्रकाश कांबळे माजी उपनगराध्यक्ष उत्तम खंदारे, माजी नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड, शामराव जोगदंड ,शाहीर कांबळे, साहेबराव सोनवणे ,मुगाची खंदारे, पी जी रणवीर, शिवाजी थोरात ,खरे गुरुजी, हनुमंत गुरुजी, पत्रकार विजय बगाटे ,मोहन लोखंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बुद्ध विहारात सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आल्यानंतर प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्रीकांत हिवाळे यांनी केले