आरक्षणाच्या मागणी साठी सुरू असलेल्या उपोषणास 50 दिवस पूर्ण
परभणी (प्रतिनिधी) दि.01/08/2024 रोजीपासून मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन सकल मुस्लीम समाज आरक्षण कृती समिती तर्फे उपोषास बसण्यात आलेले आहे त्यातील मुख्य मागण्या महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाला शिक्षणामध्ये व नोकऱ्यामध्ये 5% आरक्षण बहाल करण्यासाठी अंमलबजावणी आदेश जी.आर. काढण्यात यावा व मौलाना आझाद आर्थिक वित्त व विकास महामंडळ मार्फत बेरोजगार युवक व युवतींना देण्यात येणाऱ्या कर्ज रक्कमेमध्ये वाढ करुन व वार्षीक रक्कमे मध्ये वाढ करण्यात यावी व हजरत मोहम्मद पैंगबर नबी सल्लाहु सल्लम यांची अव्हेलना रोकण्याबाबत विशेष कठोर कायदा नामुसे रिसालत व अजमते साहाबा कायदा बनविण्यात यावा अशा विविध मागण्यासाठी हे उपोषण सुरु असुन त्यास अंशतः यश मिळुन एक मागणी म्हणजेच मुस्लीम समाजासाठी ची स्थापना करावी हि मागणी महाराष्ट्र शासनाने दि.07/08/2024 रोजी मंजुर केली असून मार्टीची स्थापना नजदीकच्या काळात होणार आहे, त्याचा शासनाने जी.आर. सुध्दा प्रसिध्द केला आहे. सकल मुस्लिम समाज तर्फे सुरू असलेल्या साखळी उपोषणास आज ऐतिहासिक 50 दिवस पूर्ण होत आहे या उपोषणास सर्व धर्म व विशेष म्हणजे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू सामाजिक संघटना राजकीय पक्ष धार्मिक संघटना यांचा विशेष साथ मिळाला परभणी जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 50 दिवस पूर्ण करणारा हा पहिला उपोषण ठरला आहे या उपोषणक्षणाच्या या 50 दिवसाच्या कार्यकाळात जिल्ह्यात भीषण पाऊस व भीषण गर्मी व तुफान हवा वारा सहन करत आपले 50 दिवस पूर्ण करीत आहे या 50 दिवसाच्या कार्यक्रमात विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष धार्मिक संघटना पक्षाचे नेते परभणीचे पालकमंत्री बनसोडे साहेब, आ. डॉ. राहुल पाटील, जिंतुर येथील माजी आ. विजय भांबळे, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष संतोष चकोर, रिपब्लीक पार्टीचे वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र गटचे जाकेर लाला, वंचि आघाडीचे नेते डॉ. धर्मराज चव्हाण, मायनोरेटी कॉन्फ्रेन्स कमिटी माजेद बशी आणि पाथरी विधानसभेचे आ. सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गंगाधर बापुराव जवंजाळ पाटील, राष्ट्रवादीचे नेते मोहम्मद गौस झेन, राजकीय पक्षांनी भेटीगाठी दिलेल्या आहेत व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, रासपा, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट व सकल मराठा समाज, आर.पी.आय. आठवले गट, बहुजन मुक्ती मोर्चा, तसेच ग्राम पंचायत शेंद्रा, रेणाखळी, डफवाडी, भोगाव, मांडाखळी, पेडगांव, तरोडा, ताडबोरगांव, सिंगणापूर, तसेच सामाजिक संघटन लोकश्रेय मित्र मंडळ, परभणी जिल्हा मुस्लीम टकारी विकास संस्था, कामगार संघटना, स्टुडंड फेडरेशन ऑफ इंडिया, विविध महिला संघटन, सत्यम दिव्यांग संघटना, लोकस्वातंत्रय पत्रकार महासंघ, इसलाह माशेरा अँड चॅरेटबल सोसायटी परभणी, टिपु सुल्तान सेवाभावी संस्था परभणी अॅड. आसेफ पटेल व इतर सामाजीक संघटन, इमाम व उलमा संघटना परभणी व परभणी येथील विविध सामाजिक संघटनानी सुध्दा लेखी स्वरुपात पाठींबा दिला आहे. परंतु जिल्हा प्रशासनाकडुन एकही अधिकारी यांनी येऊन या उपोषणार्थी यांची भेट घेतली नाही व शासना पर्यंत मुस्लीम समाजाच्या भावना पोहचविलेल्या नाहीत, त्यामुळे निराश होऊन बांधकाम करण्याची परवानगी सुध्दा मागितली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी भेटीसाठी मुंबई येथे बोलविलेले आहे. याबद्दल सकल मुस्लिम समाज संघटनेचे अध्यक्ष मौलाना जहांगीर नादवी यांनी सर्वांचे आभार मानले आहे आणि हा उपोषण असेच पुढे चालू राहणार आहे असे सूचनाही केले आहे तसेच मुस्लिम समाज कृती समितीचे अध्यक्ष मौलाना जहांगीर नदीव, मौलाना जहीर अब्बास खासमी, जाफर खान मुसा खान, अॅड. इम्तियाज खान, मुदस्सीर असरार, सय्यद सगीर, मोहम्मद ईलियास, शेख अखिल शेख रहिम, हाफेज मुंतजीब खान, मौलाना खुद्दूस मिल्ली, सय्यद आफरोज, खाजा अशरफोद्दीन, यासीन इनामदार, शेख इम्राण, मोहम्मद ईसा हे लोक व सकल मुस्लीम समाज परभणी दररोज परिश्रम घेत आहेत.