वसमत शहरात २८ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
पुढीलवर्षी 100 जोडप्यांचा विवाह सोहळा घेण्याचा संकल्प - सय्यद इम्रान अली
वसमत: (प्रतिनिधी) शहरात प्रथमच ईद ए मिलादुन्नबी निमित्ताने गुरुवार रोजी 28 जोडप्यांचा विवाह सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत हजारोंच्या साक्षीने संपन्न झाला
असून पुढीलवर्षी 100 जोडप्यांचा विवाह सोहळा घेण्याचा संकल्प आयोजक सय्यद इम्रान अली यांनी केला आहे
वसमत शहरात जशने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जातात,यंदा 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वा दरम्यान जि.प शाळेच्या मैदानावर वसमत तालुक्यातील 28 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मौलाना सुफी मुजमिल,मौलाना इम्तियाज बरकाती, मुफ्ती अल्ताफ रजा,हाफेज मुर्तुजा अली यांनी धार्मिक रितिरिवाजाने सर्व लग्न विधी पार पाडली या वेळी प्रत्येक जोडप्यास संपूर्ण संसार उपयोगी साहित्य देण्यात आले.
या विवाह सोहळ्या प्रसंगी आयोजक सय्यद इम्रान नासेर अली यांनी आपले मनोगत व्यक्त करताना धार्मिक विधी प्रमाने साध्या व सोप्या पद्धतीने विवाह पार पाडण्याची प्रेषित महोम्मद पैगंबर यांनी दिलेल्या शिकवणीचा आदर्श डोळ्या समोर ठेवून या वर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे असून सर्व वसमतकरांच्या सहकार्याने पुढील वर्षी 100 जोडप्यांचा सामुदायिक विवाह करण्याचा संकल्प केला त्यास ईद मिलाद कमेटीचे अध्यक्ष तथा संयोजक मोहम्मद अतीख यांनी मदत करण्याची ग्वाही दिली लग्न स्थळी व अन्य दोन फंगशन हॉल येथे व-हाडी मंडळींची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती
माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजूभैया नवघरे,माजी नगराध्यक्ष अब्दुल हफिज, शिवदासजी बोड्डेवार,महंमद अतिख
यांनी लग्न सोहळ्या प्रसंगी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी,विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी,पत्रकार सह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता लग्न सोहळ्याचे संचलन फेरोज शफीउल्ला पठाण व शेख मुद्स्सीर यांनी केले तर आभार सय्यद इम्रान अली यांनी मानले सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सय्यद इम्रान अली मित्रपरिवार व ईद मिलाद समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले
दोन सख्या भावांनी उचलली 5 लग्न सोहळ्याच्या खर्चाची जबाबदारी पुढील वर्षी सामुदायिक विवाह सोहळे घेण्याचा संकल्प आयोजन समितीने केला असता वसमत शहरातील तखी अहेमद नजीर अहमद व हादी अहेमद नजीर अहेमद या दोन सख्या भावांनी पुढील वर्षी 5 सामुदायिक विवाह सोहळ्याचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे.