दिव्यांगांसाठी उपोषण करणा-या दोघांनी तब्येत बिघडली
तहसिलदार नायब तहसीलदार तातडीने भेटीला;बीडीओ बेपत्ता
पूर्णा(प्रतिनिधी)
दिव्यांगांच्या न्याय हक्क विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सुरू केलेल्या आमरण उपोषणार्थ्यांपैकी दोघां जणांची तब्बल खालावली आहे.उपोषणाकडे पंचायत समितीच्या बीडीओंनी दुर्लक्ष केले असले तरी मात्र उपोषणार्थ्यांच्या भेटीला तहसील नायब तहसीलदार यांनी धाव घेऊन उपोषण सोडवण्यासाठी विनंती केली.
पूर्णा पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिव्यांगांच्या ग्रामपंचायतीमार्फत दिव्यांगांना दिला जाणारा ५ टक्के निधी द्यावा, प्रथम प्राधान्याने दिव्यांग, विधवा महिला, निराधारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल द्यावे, दस्तापूर ग्रामपंचायतीने रोजगार हमी योजनेतून केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागण्यांसाठी बुधवार दि.१८ रोजी पासुन प्रहारचे तालुका अध्यक्ष शिवहार सोनटक्के, पवन जोगदंड, सिध्देश्वर आगलावे, विठ्ठल जोगदंड, बाबाराव देशमाने, रामभाऊ गाडेकर, प्रकाश शिनगारे, उत्तमराव सोळंके यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दोन उपोषणार्थ्यांची तब्बल खालावली असल्याचे समजताच तहसीलदार माधवराव बोथिकर,नायब तहसीलदार प्रशांत थारकर,तलाठी गोरे आदींनी उपोषणार्थ्यांची भेट घेतली उपोषण सोडवण्याची विनंती केली.परंतु यात कोणताही तोडगा निघाला नसल्याचे समजते.दोन दिवसांपासून उपोषण सुरू असताना गटविकास अधिकारी अथवा इतर अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांकडे पाठ फिरवल्याची नाराजी उपोषण कर्त्यांनी बोलून दाखवली.