परभणी (प्रतिनिधी) परभणी शहरात शुक्रवार 20 सप्टेंबर रोजी शहरातील प्रमुख मार्गावरून ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त जुलूस- ए -मोहम्मदी काढून शांती चा संदेश देण्यात आला.
*लबैक या रसूल अल्लहा*. *सरकार की आमद मरहबा* या घोषणेने परिसर दणाणून गेले होते. जुलूस मध्ये सहभागी मुस्लिम बांधवांनी हातात शांतीचे संदेश देणारे बॅनर व फलक घेतले होते. जुलूस मध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक विशेषता राजकीय नेते सामाजिक धार्मिक क्षेत्रातील प्रमुख मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात ठीक ठिकाणी जुलूस च्या स्वागतासाठी लोकांनी फुले उधळून स्वागत केले. ठीक ठिकाणी शरबत पाणी मिठाई जुलूस मध्ये सामील लोकांना वाटण्यात आले. ह्या जुलूस ची सुरुवात शुक्रवारची नमाज नंतर मस्जिद ए बिलाल ग्रँड कॉर्नर पासून सुरू झाली व शाही मजीद नारायणचाळ. मुल्ला मस्जिद. शिवाजी चौक. सुभाष चौक. इदगा मैदान वर जुलूस चा समारोप झाला.
जुलूस यशस्वी करण्यासाठी जुलूस कमिटीचे स्वयंसेवकांनी परिश्रम घेतला तसेच पोलीस प्रशासनाचाही फौज फाटा मोठ्या संख्येने उपस्थित होते.