वालुरात आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पावसाची हजेरी
वालूर(प्रतिनिधी बिलाल तांबोळी)
आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी (दि.23) सायंकाळी 5.30 ते 6 वाजेच्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसून येत होते तर वातावरणात ही उकाडाही जाणवत होता त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गर्मी होती. त्यामुळे पाऊस विजांच्या कडकडाटासह 5.30 वाजेच्या सुमारास सोमवारी जोरदार पाऊस सुरू झाला. अर्धा ते पाऊण तासामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झाले. वालूर येथील सखल भागामध्ये पाणी जमा झाले तर वालूरमध्ये ग्रामपंचायत मार्फत पाईपलाईनसाठी जे रस्त्याच्या मधोमध खोदकाम आले होते त्यामुळे पाऊस पडल्यानंतर रहदारीसाठी अडथळा निर्माण होत आहे. मात्र याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष दिसून येत आहे. तसेच शेतकर्यांसाठी कापूस या पिकासाठी हा पाऊस जीवदान देणारा असून सोयाबीन या पिकासाठी थोडा अडचणीचा होत आहे. काही शेतात सोयाबीन काढणीस आलेले आहे तर काही शेतात काही दिवसांचा वेळ आहे. त्यामुळे या शेतामध्ये मजूर वर्गासाठी आणि हार्वेस्ट मशीनही जाण्यासाठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.