रस्त्यावरील अतिक्रमण हटवून नालेसफाई करा
आ.बाळापूर येथील नागरिकांची निवेदनाद्वारे मागणी
आखाडा बाळापूर (प्रतिनिधी)
आखाडा बाळापूर येथील वार्ड क्र.06 मधील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून दोन्ही बाजूच्या नाल्याच्या पाण्याची विल्हेवाट लावावी अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयात शिवसेना उपसरकलप्रमुख जाहीर शेख व नागरिकांच्या वतीने देण्यात आले आहे आ. बाळापूर मधील वार्ड क्र.06 मध्ये घाणीचे साम्राज्य झाले असून डॉ.आंबेडकर सभागृह लगतच जात असलेल्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाले आहे त्यातच रस्त्यावर नाल्याच्या घाण पाणी साचल्याने रस्त्यावरून ये जा करताना कमालीची अडचणीचा सामना करावा लागत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाल्याचे पाणी रस्त्यावर साचून सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे परिणामी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे येथील नागरिकांना चार चाकी वाहनाने दवाखान्यात अथवा इतर ठिकाणी ये जा करायची असल्यास कमालीची कसरत करावी लागत आहे
वार्ड क्रमांक सहा मधील झालेले अतिक्रमण व घाणींचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले असून निवेदनावर शिवसेना उपसरकल प्रमुख जहीर शेख,रविकांत नरवाडे, सय्यद नसीम,जहीर इसाक,अखिल शेख, शेख नदीम, शेख नसीर, शेख जावेद यांच्यासह आदि जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत