महाराष्ट्र
दररोजच्या पावसाने सोयाबीन पिकाचे फार मोठे नुकसान
दररोज पाऊस पडल्याने नदी नाल्याला पूर.. शेतकऱ्यांचे स्वप्न मात्र चक्का चुर
हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे शेत शिवारामध्ये दररोजच पाऊस पडत असल्याने ज्या काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक काढले ते गेल्या तीन ते चार दिवसापासून दररोजच भिजल्याने त्यांना मोड फुटले आहेत.
प्रतीक शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक चांगले येण्यासाठी लाखो रुपयाचा खर्च करून सुद्धा काढणीला आलेले सोयाबीन व काही काढून टाकलेले सोयाबीन भिजल्यामुळे हिंगोली तालुक्यातील शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
तरी संबंधित तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार व लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.