प्रोस्परस पब्लिक स्कूल येथे “कॅप सेरेमणी व भगत सिंग जयंती सोहळा संपन्न
सेलू (प्रतिनिधी) रोजी श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूल येथे प्रेसिडेन्शिअल परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस ऑरेंज कॅप व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांस यल्लो कॅप देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्राचार्या सौ. प्रगती क्षीरसागर, पालक व आदी मान्यवर उपस्थित होते. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. उपस्थित पालकांनी मनोगत व्यक्त करतांना अश्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून गुणवंत विद्यार्थी घडवतात म्हणून अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांचे खूप खूप धन्यवाद मानले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांना भगतसिंग यांच्या विषयी माहिती देऊन यशस्वी जीवनासाठी मार्गदर्शन केले. यामध्ये शाळेतून असे छोटे छोटे टारगेट मुलांना देऊन त्यांच्यामध्ये गुणवत्ता वाढवण्याचे प्रयत्न केले जाते. यातूनच त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होते. वर्ग १ ला (A) आवटे प्रगती, डोके अनवीता, ( B ) येवले समर्थ, कांबळे आयुशी, वर्ग २ रा चाटे गौरव, आघाव साईराज, वर्ग ३रा शिंदे हर्षद, फंड क्षितिज, वर्ग ४ था साबळे श्रेयस, बरसाले स्वरा, वर्ग ५ वा खंदारे शितल, असद सय्यद वर्ग ६ वा राऊत बालाजी, शेवाळे प्रज्वल, वर्ग ७ वा टेंबरे रिया, मोगल सौरभ, वर्ग ८ वा शिंदे कार्तिक, चव्हाण ऋतुराज, वर्ग ९ वा काकडे विठ्ठल, गरड श्रवण, वर्ग १० वा चव्हाण अक्षरा, पवार आयुष या विद्यार्थ्यांना ऑरेंज कॅप व येलो कॅप मिळाले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सारिका ताठे यांनी केले.