मराठवाडा
बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थिनीची गैरसोय
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सुलदली गोरे येथील सावित्रीच्या लेकीला सेनगाव ला शाळेत जाण्यासाठी बस वेळेवर येत नसल्याने शाळकरी मुलींची गैरसोय होत आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की जनसंवाद दौऱ्यानिमित्त डॉक्टर विठ्ठल रोडगे हे सेनगाव तालुक्यातील सुलदली गोरे येथे गेले असता. सुलदली गोरे येथील पाचवी ते आठवी दरम्यानच्या विद्यार्थिनी रस्त्याने पाही येत असताना दिसल्याने त्यांची विचारपूस डॉक्टर विठ्ठल रोडगे यांनी केली असता.एसटी महामंडळाचीबस सुलदली गावा जवळचा रस्ता खराब झाल्याने बस गावात येत नाही. म्हणून या चिमुकल्या विद्यार्थिनींना दोन किलोमीटर पायी जावे लागते. या विद्यार्थिनी आज बस स्टॉप वर सेनगाव ला शाळेत जाण्यासाठी पायी सुलदली पाटीवर गेले असता त्यांना एसटी महामंडळाची बस न थांबल्याने. ह्या विद्यार्थिनी परत सुलदली गावी परत पाई येत असताना दिसल्या.
यावेळी डॉक्टर विठ्ठल रोडगे यांनी या विद्यार्थ्यांची चौकशी केली असता विद्यार्थी म्हणाल्या की बस आमच्या गावात रस्ता खराब झाल्याने येत नाही म्हणून आम्हाला दररोज दोन किलोमीटर पायी यावे लागते.व सुलदली पाटीवर आम्ही येऊन सुद्धा एसटी महामंडळाची बस थांबत नसल्याने आमची गैरसोय होत आहे. तरी संबंधित एसटी आगार प्रमुखांनी येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बस गावामध्ये पाठवावी. व संबंधित विभागांनी रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी डॉक्टर विठ्ठल रोडगे यांनी यावेळी केली. यावेळी डॉक्टर विठ्ठल रोडगे यांच्या समवेत शिवाजी कऱ्हाळे, विठ्ठल वाबळे, गणेश पोले बंडू मुटकुळे उपस्थित होते.