विपश्यना केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्यास हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे
सरपंच भीमाबाई नरवाडे यांचे आवाहन
आखाडा बाळापूर – प्रतिनिधी
मराठवाड्यातील सर्वात भव्य असे विपश्यना केंद्र कळमनुरी मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांच्या प्रयत्नातून उभे राहत आहे.त्याचा भूमिपूजन सोहळा 29 सप्टेंबर रोजी पारडी मोड येथे संपून होत आहे.या सोहळ्यास उपासक उपसिका व भीमसैनिकांनी हजारो च्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आखाडा बाळापूर च्या सरपंच भीमाबाई उत्तमराव नरवाडे यांनी केले आहे.
सदरील कार्यक्रमाची आ.संतोष बांगर मित्र मंडळ व बौद्ध बांधवांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत असून भूमिपूजन सोहळा भा. बौ.महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांचे प्रमुख उपस्थितीत पू.भन्ते महाथेरो,पू.भन्ते खेमधमो महाथेरो,पू.भन्ते उपगुप्त महाथेरो,पू.भन्ते डॉ सत्यपाल,पू.भन्ते विनायबोधी पू.भन्ते दयानंद यांचे सह अनेक भन्ते यांचे हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे.
संस्कृतीक कार्यक्रम या सोबत च भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे.
आमदार संतोष बांगर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आ.बाळापूर च्या सरपंच भीमाबाई नरवाडे यांनी केले आहे. ,